नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या झटक्याने ; गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ

जानेवारी 1, 2026 10:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२६ । २०२६ या वर्षाची सुरुवात महागाईच्या झटक्याने झाली आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२६ रोजी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १११ रुपयांची वाढ केली. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) वर लागू होते. दिलासादायक म्हणजे, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, दर जैसे थे आहेत.

gas

गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाई सातत्याने वाढताना दिसत आहेत. त्यामध्येच आता एलपीजी सिलेंडरच्या भावात थेट वाढ करण्यात आली. हे नवीन दर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली. महागाई कमी केल्याचा दावा सातत्याने सरकारकडून केला जात असला तरीही ही वस्तूस्थिती आहे की, मागील काही वर्षांपासून महागाईत मोठी वाढ झाली आहे.

Advertisements

राजधानी दिल्ली ते मुंबई आणि पुणे ते कोलकाता सर्व शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १११ रूपायंची वाढ झाली आहे इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर १६९१.५० रुपयांना मिळेल. डिसेंबर २०२५ मध्ये या गॅस सिलिंडरची किंमत १५८०.५० रुपये इतकी होती. कोलकातामध्ये गॅस सिलिंडर १७९५ रुपयांना मिळेल. मुंबईत आजपासून व्यावसायिक सिलिंडर १५३१.५० रुपयांऐवजी १६४२.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये आजपासून व्यावसायिक सिलिंडर १८४९.५० रुपयांना मिळेल.

Advertisements

घरगुती गॅस सिलिंडरचे दर काय ?
व्यासायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली, त्याचा फटका हॉटेल-रेस्टॉरंट मालकांना बसणार आहे. पण दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर राजधानी दिल्लीत ₹८५३, मुंबईत ₹८५२.५० आणि लखनौमध्ये ₹८९०.५० ला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now