---Advertisement---
वाणिज्य

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! गॅस सिलेंडर दरात मोठी कपात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२५ । व्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१ रुपयांने कमी केल्या आहेत. मात्र ही कपात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी आहे. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Untitled design 7 jpg webp webp

मार्च महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती. आज झालेल्या घसरणीनंतर आता दिल्लीत सिलेंडरची किंमत १८०३ रुपयांवरून १७६२ रुपयांवर आली आहे. मुंबईत ही किंमत १७५५.५० रुपयांवरून १७१३.५० रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे, चेन्नईमध्ये आजपासून १९६५.०० रुपयांऐवजी १९२१.५० रुपये द्यावे लागतील. कोलकातामध्ये आता सिलिंडर १९१३.०० रुपयांऐवजी १८६८.५० रुपयांना उपलब्ध होईल.

---Advertisement---

याशिवाय, हवाई इंधनाच्या (एटीएफ) किमतीतही ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलीटरने कपात करण्यात आली आहे. या नवीन किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत.एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात. जागतिक कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारावर गॅसच्या किंमतीत बदल केला जतो. व्यावसायिक एलपीजीच्या दरांमध्ये वारंवार बदल होत असताना, घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजीच्या किमती स्थिर आहेत.तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. हे सिलिंडर पूर्वीप्रमाणेच ८०३ रुपयांच्या दराने उपलब्ध राहील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment