---Advertisement---
वाणिज्य

डिसेंबरची सुरुवात महागाईने : पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, पहा कितीने महागला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | 1 डिसेंबर 2023 | दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतात. त्याच नुसार आज डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले असून यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या  दरात तब्बल १०१.५० रुपयांची वाढ झाली होती.

Untitled design 7 jpg webp webp

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २१ रुपयांनी वाढवले आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्याने मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १७४९ रुपये इतके झाले आहेत.

---Advertisement---

घरगुती गॅस सिलिंडर दर किती?
दुसरीकडे घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांची कपात केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यात कुठलाही बदल करण्यात आला नाही. जळगावात घरगुती गॅस सिलींडरचा दर ९०८ रुपयांवर आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---