⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर.. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

खुशखबर.. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर 198 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. वाढत्या महागाईतून दिलासा कधी मिळणार अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून होत आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील प्रमुख गॅस कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (Commercial Gas Cylinder) 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र दुसरीकडे 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झाली नाही.

व्यवसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आलेल्या कपातीनंतर व्यवसायिक गॅस सिलिंडरचे (Gas Cylinder) दर प्रति सिलिंडर 2021 रुपयांवर पोहोचले आहेत. कपात करण्यापूर्वी गॅस सिलिंडरचे भाव 2,219 रुपये इतके होते. गेल्या महिन्यात देखील गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. जून मध्ये गॅस कंपन्यांनी व्यवसायिक सिलिंडरच्या दारत 136 रुपयांची कपात केली होती. सलग दोन महिने व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता हॉटेलमधील पदार्थ स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिलिंडर 300 रुपयांपेक्षा स्वस्त
यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात ३०० रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल १९ मे रोजी करण्यात आला होता.

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत सिलेंडरमागे २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.