जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल येथे गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले असून यामध्ये दांडिया किंग म्हणून हिमेश जैन, तर दांडिया क्वीन म्हणून नेहा वनरा ठरली आहे. तसेच गरबा किंग म्हणून हर्षिल गांधी तर गरबा क्वीन म्हणून अनुष्का पाटील हे विजयी ठरले.
जळगाव शहरात नवरात्रौत्सव निमित्त दांडिया, गरबा नृत्यामध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आले. दरम्यान, शहरातील खान्देश सेंट्रल इथे श्री इव्हेंट्स यांच्याकडून गरबा दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याला स्पर्धेला गुजराती समाज मित्र मंडळ, जळगाव व अध्यक्ष जयेश भाई कामाणी यांचे विशेष सहकार्य लाभले.
बेस्ट गरबा – दांडिया ३५ वर्षावरील विजेते
महिला-
रश्मी शेठ, गरबा
चेतना दोषी, दांडिया
बेस्ट कपल :
कश्मिरा पंचमीया और मनीष लुणिया
बेस्ट ड्रेस मेल – करन शाह
बेस्ट ड्रेस फिमेल – चौहान अभिश्री
बेस्ट दांडिया किड्स मेल: रिदीत मराठे
बेस्ट दांडिया किड्स फिमेल : साक्षी जैन
बेस्ट ड्रेस किड्स मेल – विराज सराफ
बेस्ट ड्रेस किड्स फिमेल – विह सराफ
बेस्ट कपल किड्स – अनेरी सराफ और विराज सराफ
बेस्ट ओरिजिनल ट्रॅडिशनल ड्रेस – नामिश पंचमीया
परीक्षक म्ह्णून श्वेतल शाह, निकिता सुरतवाला, भावना चौहान, अपर्णा भट यांनी काम पाहिले