जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२३ । 11 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ (Gadar-2) सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. पण बॉक्स ऑफिसवर मात्र ‘गदर -2’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
पहिल्या दिवशी दमदार कमाई केल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी ‘गदर-2’सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गेल्या दोन दिवसात या चित्रपटाने जवळपास 83 कोटीहून अधिकच गल्ला जमवला असून सिनेमाची दोन दिवसांची कमाई पाहता रविवारी ‘गदर २’ सिनेमी 100 कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘गदर-2’ ने ओपनिंगच्या दिवशी जवळपास 40 जमवला कोटींचा गल्ला जमवला होता. तर अक्षय कुमार स्टारर OMG 2 सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, OMG 2 सिनेमाने शनिवारी 14.5 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर पहिल्या दिवशी सिनेमाने 10.26 कोटी रुपयांचा गल्ला पार केला होता. OMG 2 सिनेमाने दोन दिवसात फक्त 27.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.