⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | फळपिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा : खा. उन्मेश पाटील

फळपिक विम्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा : खा. उन्मेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील १०८० पात्र विमाधारक शेतकऱ्यांना सात कोटी तीन लाख दोन हजार तीनशे दहा रुपये इतकी रक्कम मंजूर झालेली असून लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी घेतलेली आग्रही भूमिका फळाला आली असल्याची भावना खासदार उन्मेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२१-२२ अंतर्गत मृग बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील मोसंबी, लिंबू , डाळिंब, सिताफळ, पेरू इत्यादी फळपिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. यावर्षी खरिप हंगामातील पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता फळपिक लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता. दरम्यान, खासदार उन्मेश पाटील यांनी, विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विमा रक्कम मंजूर करून अदा करण्यात यावी, अशी मागणी दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी, जळगाव यांना पत्राद्वारे केली होती.

असे आहेत तालुका व पिक निहाय पात्र लाभार्थी
अमळनेर तालुक्यातील पेरू, लिंबू, डाळिंब उत्पादक २४ शेतकऱ्यांना १७ लाख, ४६ हजार ३००, भडगाव तालुक्यातील लिंबू, मोसंबी, डाळिंब उत्पादक ३८४ शेतकऱ्यांना २ कोटी, २६ लाख, ९ हजार १००, चाळीसगाव तालुक्यातील लिंबू, मोसंबी, डाळिंब उत्पादक ७२ शेतकऱ्यांना ५६ लाख, ३८ हजार ६००, धरणगाव तालुक्यातील पेरू, लिंबू, डाळिंब उत्पादक ४ शेतकऱ्यांना ४ लाख, ५९ हजार ८००, एरंडोल तालुक्यातील पेरू, लिंबू, मोसंबी उत्पादक २३५ शेतकऱ्यांना १ कोटी, ६२ लाख, ६६ हजार ८५०, जळगाव तालुक्यातील पेरू, लिंबू, डाळिंब उत्पादक ८ शेतकऱ्यांना ७ लाख, ४ हजार ३५०, पाचोरा तालुक्यातील सिताफळ, पेरू, मोसंबी, डाळिंब उत्पादक १५५ शेतकऱ्यांना १ कोटी, २२ लाख, ९२ हजार ९००, पारोळा तालुक्यातील पेरू, लिंबू, मोसंबी, डाळिंब उत्पादक ५४ शेतकऱ्यांना ५२ लाख, ९४ हजार ५००, रावेर तालुक्यातील पेरू, डाळिंब उत्पादक ४९ शेतकऱ्यांना २८ लाख, ३० हजार ६०, मुक्ताईनगर तालुक्यातील लिंबू व डाळिंब उत्पादक ६ शेतकऱ्यांना ७ लाख, ४२ हजार ८००, जामनेर तालुक्यातील सिताफळ, पेरू, लिंबू, मोसंब उत्पादक ५३ शेतकऱ्यांना २२ लाख ९७ हजार, चोपडा तालुक्यातील पेरू, लिंबू, डाळिंब उत्पादक २४ शेतकऱ्यांना १४ लाख, ८६ हजार ४५० तर भुसावळ तालुक्यातील लिंबू व डाळिंब उत्पादक १२ शेतकऱ्यांना २ लाख ७३ हजार ६००

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.