जळगाव जिल्हा

वीज वहिनीत वारंवार बिघाड, नवीन वाहिनीसाठी महामार्ग प्राधिकरणाला पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनील महाजन । नशिराबाद येथील महामार्गालगत भूमिगत केबल टाकण्यात आली आहे, मात्र चौपदरीकरणाच्या कामात त्या केबलला तीन ते चार ठिकाणी जोडणी केली आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होऊन केबल डोकेदुखी ठरत आहे. भविष्यात त्याचा आणखी त्रासहॊवू नये, म्हणू नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने महामार्ग प्राधिकरणाला पत्राद्वारे केली आहे.

नशिराबाद गावाला वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ११ केव्ही वीज वाहिनीत वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीज पुरवठा विस्कळीत होत आहे. नशिराबाद येथील महामार्गालगत सुनसगाव, बोदवड फाटा, तरसोद फाटा, काझी पेट्रोलपंप या ठिकाणी वारवांर बिघाड होत असल्याची तक्रार वीज वितरण कंपनीने केली आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे या परिसरात भूमिगत केबल टाकण्यात आली आहे, मात्र चौपदरीकरणाच्या कामात त्या केबलला तीन ते चार ठिकाणी जोडणी केली आहे. हि केबल आताच इतकी डोकेदुखी ठरत आहे, तर भविष्यात त्याचा किती त्रास होणार म्हणून त्याकरता आत्तापासून नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी, अशी मागणी वीज वितरण कंपनीने महामार्ग प्राधिकरणाला पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता पवन वाघुळदे यांनी पत्राद्वारे माहिती दिली. महामार्ग प्राधिकरण या समस्याबाबत दखल घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

लवकरच कार्यवाही
या समस्येबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. समस्या सोडण्याबाबत संबधितांना सूचना देण्यात आली आहे.
– चंदकांत सिंह, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button