जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मणक्याच्या फ्रॅक्‍चरवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड अथक प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । घरात पडल्यामुळे मणक्याला झालेल्या फ्रॅक्‍चरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

याबाबत माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील मोताळा येथील ज्योती दोडे ही महिला काम करतांना जमीनीवर पडली. यात तिच्या मणक्याला जबर मार बसला. त्यामुळे तिच्या पायातील ताकद कमी होऊन तिला चालणे देखिल अशक्य झाले होते. अशा परीस्थितीत या महिला रूग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका शल्यचिकीत्सक तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी रूग्णाच्या विविध तपासण्या केल्या असता मणक्यात फ्रॅक्‍चर असल्याचे निदान करण्यात आले.

मणक्याचे हे फ्रॅक्‍चर जोडण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या महिलेवर स्पाइन फ्रॅक्‍चर शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या पायातील ताकद आता पूर्ववत होऊ लागली. अनुभव आणि कौशल्याच्या बळावर मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्मृती भोजने, डॉ. आशिष, डॉ. मैत्रेयी बिरादर, डॉ. श्वेता गाडवे यांनी सहकार्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button