नोकरीचे आमिष दाखवून साडेबारा लाखाचा लावला चुना; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नोव्हेंबर 22, 2025 11:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । हल्लीच्या घडीला फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. त्यात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविले जात आल्याचे प्रकार सत्यातने समोर येत आहे. असाच एक प्रकार जळगावमधून समोर आलाय. ज्यात मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वृद्धाची १२ लाख ५० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

जळगावच्या निमखेडी शिवारमध्ये राहणारे संतोष माणिक चौधरी (६७) यांचा मुलगा जगदीश चौधरी याला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे संदीप वसंत भोळे, दीपाली संदीप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव) व त्यांचे साथीदार धीरज पांडुरंग मुंगलमारे (रा. सिंदूरवाफा, जि. भंडारा), अण्णा नामदेवराव गोहत्रे (रा. नागपूर) यांनी सांगितले. त्यासाठी चौघांनी फिर्यादीकडून रोख व ऑनलाइन पद्धतीने एकूण १५ लाख रुपये स्वीकारले. याप्रकरणी संतोष चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Advertisements

बनावट नियुक्ती आदेश
पैसे घेतल्यानंतर जगदीश यांना रेल्वेच्या नोकरीचा बनावट नियुक्ती आदेश दिला. मात्र, प्रत्यक्षात नोकरी काही लागली नाही. नोकरी न मिळाल्याने तक्रारदाराने पैसे परत मिळावे, अशी मागणी केली. त्यावेळी केवळ २ लाख ५० हजार रुपये परत दिले. वारंवार मागणी करूनही उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये परत न करता फसवणूक केली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now