गुन्हेजळगाव जिल्हा

विश्वासघात: जळगावच्या व्यापाऱ्याची लाखो रुपयात फसवणूक, असे गंडविले?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२५ । फसवणुकीच्या घटना थांबता थांबत नसून याच दरम्यान जळगावच्या पिंप्राळा भागात फसवणुकीची एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्याची 2 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?
कांचन सुरेश येवले (वय 38) हे पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगर येथे राहतात आणि त्यांचा पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे (रा. गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजी नगर) याने कांचन येवले यांच्याशी संपर्क साधला आणि विश्वास संपादन करून त्यांना 170 पशूखाद्याच्या गोण्या पाठवून देण्याची विनंती केली. आरोपीने सांगितले की त्याला हा सामान व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आहे.

कांचन येवले यांनी आरोपीवर विश्वास ठेवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे 2 लाख 34 हजार रुपये किंमतीच्या 170 पशूखाद्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक स्वतः जाऊन आरोपीला पोहचवून दिला. मात्र, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता आरोपीने व्यापारी यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, कांचन येवले यांनी सोमवार, 30 डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारावर संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी समुदायात खळबळ माजली आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button