⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | नागरिकांनो सावधान! KYC च्या नावाखाली लावला एक लाख रुपयाचा चुना

नागरिकांनो सावधान! KYC च्या नावाखाली लावला एक लाख रुपयाचा चुना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशातच भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील संतधामजवळ पंढरीनाथनगरमध्ये राहणाऱ्या गौतम खरे यांना एका भामट्याने केवायसीच्या नावाखाली लाखो रुपयाचा चुना लावला आहे. बँक प्रतिनिधी असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने भामट्याने एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौतम खरे यांच्या मोबाईलवर २२ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले व बँक अकाउंट (केवायसी) अपडेट करण्याबाबत सूचना केल्या. तसेच मेसेज आल्याने लिंक ओपन करून माहिती भरून दिल्यानंतर मोबाईलवर ओटीपी पाठवून त्यावरून एक लाख रुपयांचे ट्रान्झेक्शन करून फसवणूक केली.

दरम्यान, फिर्यादीला याबाबत फसवणूक झाल्याचे उशिरा लक्षात आल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गौतम नामदेव खरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तुषार पाटील करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.