⁠ 
सोमवार, मे 27, 2024

शेअर ट्रेडिंगमध्ये 15 हजार कमावले, पण 32 लाख गमावले ! जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । ऑनलाइन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून अशातच जळगावात आणखी एकाला ऑनलाईन ठगाने लाखो रुपयांचा चुना लावला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून, त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवून शहरातील खासगी नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीची तब्बल ३२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कांचननगर भागातील रहिवासी मोहन रघुनाथ सपकाळे (वय ४२) हे खासगी नोकरी करतात. त्यांना २७ मार्च २०२४ ते ११ एप्रिलपर्यंत केएसएल ग्रुप या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील शिक्षक अमोल आठवले व श्वेता शेट्टी यांनी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.त्या अॅपवर नोंदणी करून, विविध कंपन्यांचे शेअर खरेदी करण्याबाबतचे सांगण्यात आले. या अॅपवर मोहन सपकाळे यांना आभासी नफा दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर एकूण ३२ लाख २४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले. आठवले व श्वेता शेट्टी या अज्ञातांविरुद्ध फिर्याद दिली.

त्यापैकी केवळ १५ हजार रुपयांचा परतावा केला. मात्र, इतर रक्कम परत केली नाही. त्यामुळे मोहन सपकाळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन, शिक्षक अमोल आहे. त्यावरून गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत.