जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । रेल्वे प्रशासनाकडून २४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी नागपूर ते मुंबई आणि पुणे व सोलापूर ते नागपूर या चार एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कावर सोडण्यात येणार आहे.
नागपूर-मुंबई एलटीटी वन वे स्पेशल :
०१०१८ ही गाडी नागपूर येथून २४ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत…
गाडी क्र. ०१०३० ही एकेरी विशेष गाडी २४ ऑक्टोबर रोजी नागपूरहून रात्री ११ वाजता सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पावणे सहा वाजता पोहोचेल. जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत.
नागपूर-मुंबई एलटीटी वन वे स्पेशल
०१०३२ एकेरी विशेष गाडी २५ ऑक्टोबर रोजी नागपूरहून दुपारी ३ वाजेल सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनर्स मुंबईला दुसऱ्या दिवशी ८. १५ वाजता पोहोचेल. या गाडीला जिल्ह्यात भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव असे थांबे आहेत.
सोलापूर-नागपूर स्पेशल :
गाडी क्र. ०१०२९ एकेरी सुपरफास्ट स्पेशल २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८:२० वाजता सोलापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला जिल्ह्यात भुसावळ येथे थांबा आहे. दरम्यान, आरक्षित डब्यांचे तिकीट 1 बुकिंग २० ऑक्टोबरपासून सुरु होईल.