---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

वन्यजीव शिकार प्रकरणी चौघे ताब्यात; चुलीवर मटन शिजत असतांना वनविभागाचं पथक धडकलं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज| सुभाष धाडे | रंगपंचमीचा सण आणि त्यातच साळिंदरच्या मटणाचा योग, सगळे काही सुरळीत सुरू असतानाच कोण जाणे वनविभागाला कशी कुणकुण लागली. मटनावर ताव मारण्या आधीच वनविभागाचा ताफा धडकला आणि चिंचखेडा खुर्द च्या चौघांची रंगपंचमी बेरंग झाली.

muktainagar jpg webp webp

वडोदा वनक्षेत्रातर्गत असणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारात साळिंदरचे (सायळ) मटण चुलीवर शिजत असताना त्यावर ताव मारण्याच्या आधीच वनविभागाच्या पथकाने धाड टाकल्याने चिंचखेड्याच्या चौघांची रंगपंचमी काळवंडली.

---Advertisement---

चिंचखेडा खुर्द शिवारातील एका शेतात साळिंदरच्या मटणाचा बेत असल्याची खबर कुऱ्हा येथील वनविभागाच्या कार्यालयात समजली. त्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे, वनपाल बी. आर. मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुडगंडे, राम असुरे, बी. बी. थोरात, गोकुळ गोसावी, वनमजुर अशोक तायडे, अशोक पाटील यांचे पथक चिंचखेडा खुर्द शिवारातील सुपडा रामचंद्र मेनकार यांचे शेतात धडकले. त्याठिकाणी जमिनीवर पडलेले रक्त, रक्ताने माखलेली काठी, साळिंदरचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले काटे दिसून आले. सुपडा मेनकार यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चिंचखेडा येथीलच ऋषिकेश अहिरकर याचे शेतातील शेड मध्ये साळिंदरचे मास शिजवत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ तिकडे मोर्चा वळवला. घटनास्थळी जाताच त्याठिकाणी साळिंदरचे कच्चे मांस शिजत असल्याचे दिसून आले.

चौघे ताब्यात –

याप्रकरणी निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकार, ऋषिकेश सुरेश अहिरकर, सुपडा रामचंद्र मेनकार (तिघे रा. चिंचखेडा खुर्द ता. मुक्ताईनगर) शंकर साहेबराव सपकाळ रा. बुलढाणा अशा चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---