⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

कन्नड घाटात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; कार दरीत कोसळून 4 जण ठार, सात जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२३ । चाळीसगाव येथील कन्नड घाटात देवदर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. गाडी थेट दरीत कोसळली असून या अपघातामध्ये ४ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर या अपघतात तर ७ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव येथील काहीजण खासगी वाहनाने (क्र. एमएच ४१ व्ही ४८१६) ने अक्कलकोट दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतताना कन्नड घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दाट धुके आणि अंधार यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट दरीत कोसळून हा अपघात झाला.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर सात जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या अपघातील मृतांची नावे
प्रकाश गुलाबराव शिर्के (वय -६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय -६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय -३५), पूर्वा गणेश देशमुख (वय-८)
अपघातातील जखमीः
अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय – २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय – ४), रुपाली गणेश देशमुख (वय – ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५).