⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

भंगार विकून मनपाच्या तिजोरीत चार लाखांची भर

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गेल्या दोन वर्षापासून अतिक्रमणाची मोठी कारवाई केली होती. यावेळी शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या विविध व्यवसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले होते. ज्याचा खच मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या आजूबाजूला झाला होता. अश्यावेळी गेल्या २ वर्षांपासून त्या ठिकाणी भंगार पडून होते. त्या निरुपयोगी भंगारा विकून मनपा प्रशासनाने आपल्या तिजोरीमध्ये ३ लाख ९६ हजार ७४२ रुपयांची भर टाकली आहे. १० हजार ३५० किलो लोखंड विकून मनपाने ही भर आपल्या तिजोरीत टाकली आहे.

दहा हजार किलो लोखंड
शहरात अतिक्रमण करणाऱ्या व्यवसायिकांकडून मनपाने कारवाई करत अतिक्रमीत साहित्य जप्त केले होते. तेच साहित्य गेल्या वर्षभरापासून मनपाच्या इमारती मागे पडून होतो. अशावेळी हे सर्व साहित्य विकून मनपाने आपल्या तिजोरीत मोठी भर टाकली आहे. लोखंडासोबत मोठ्या प्रमाणावर लाकूड देखील मनपाकडून हस्तगत करण्यात आले होते. तब्बल तीन ट्रॅक्टर भरून लाकडं मनपाने जमा केले. ही लाकडं विकण्यात आले नसून रस्त्याकामासाठी वापरण्यात येणार आहेत. .