---Advertisement---
रावेर राजकारण

काँग्रेस आमदारासमोरच माजी नगरसेवकासह चार जणांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । राज्यात एकीकडे तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असलं तरीही या तीनही पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं सातत्याने दिसून येत आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात काँग्रेस आमदाराच्या (Congress MLA) समोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह चार जणांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) जळगाव दौर्‍यावर असतानाच हा प्रकार घडला.

Four Congress members join NCP

दरम्यान, मंत्री आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा फैजपुरातील अन्वर खाटीक यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी नवस मानला होता. तो नवस फेडण्यासाठी मंत्री आव्हाड शुक्रवारी फैजपुरात आले होते. धनाजी नाना महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांचे दुपारी दीड वाजता आगमन झाले. त्यांनी महाविद्यालयातील प्रेरणास्तंभाला भेट दिली. त्यानंतर संदलशाह बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवली. नंतर मिल्लतनगरात त्यांचा सत्कार समारंभ झाला, त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते.

---Advertisement---

यावेळी आ. चौधरींच्या समोरच काँग्रेसचे माजी नगरसेवक शेख जाफर शेख अजगर, वसीम जनाब, मुदस्सर नजर, शेहबाज खान शेख शकील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा झाला.

आपल्याच पक्षातील माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याचं पाहून काँग्रेस आमदार शिरीष चौधरी स्टेजवरुनच गायब झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराच्या समोरच राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---