धक्कादायक ! जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर आज हल्ला झाला. भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाल्या आहे. ही घटना जपानमधील नारा शहरात घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सध्या शिंजो आबे यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्या हृदयाने काम करणे बंद केले आहे. श्वासही घेता येत नाही. सध्या त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव यामागामी तेत्सुया आहे.
जपानमध्ये रविवारी वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिंजो आबे नारा शहरात भाषण देत होते. यावेळी अचानक आबे खाली पडले. त्याच्या शरीरातूनही रक्त येत होते. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शिंजो आबे यांच्यावर गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सीपीआर देण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याचं कळतंय.
शिंजो आबे यांनी 2020 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. प्रकृती खालावल्याने त्यांनी हे कृत्य केले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ते जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत. पीएम मोदी आणि शिंजो आबे अनेक प्रसंगी एकमेकांना मिस करतात. गेल्या वर्षी भारताने शिंजो आबे यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.