---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

ए.टी. नाना पाटील पक्षात पुन्हा सक्रीय ; पाच वर्षांनंतर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२३ । देशातील पाच राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला होता. यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार असून मिझोराममधील निवडणूक पार पडली. बाकी राज्याच्या निवडणुकीसाठी पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांच्याकडे तेलंगणामधील दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे.

a t nana patil jpg webp

पाच वर्षांनंतर ए.टी. नाना पाटील हे पक्षात पुन्हा सक्रीय झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. भाजपचे माजी खासदार ए. टी. नाना पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले होते. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात होतं. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर असताना त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं.

---Advertisement---

मागील काही वर्षांपासून ए.टी. पाटील फारसे पक्षात सक्रीय दिसले नव्हते. मात्र आता ते सक्रिय होऊ लागले आहेत. भाजपने त्यांच्यावर तेलंगणामधील दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे.

तेलंगणा राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांची पक्ष नेतृत्वाने नियक्ती केलीय. दोन जिल्हे आणि तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलीय. मेहबूबाबाद जिल्ह्यातील डोनाकल विधानसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला. या उमेदवारांसह प्रचाराचा फोटो आणि माहिती त्यांनी आपल्या फेसबुकवर टाकलीय.

पक्षाच्या राष्ट्रीय नेतृवाने आपल्या सक्रीय करून घेतल्याचे त्यांनी दाखवून दिलं. तेलंगणा निवडणुकीसाठी त्यांच्यावर जबाबदारी जरी दिली असेल त्याचा जळगावमधील राजकारणा परिणाम होणार आहे. माजी खासदार पाटील यांच्या सक्रीय होण्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणित बदलतील अशी शक्यता आहे. जळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार उन्मेष पाटील राहणार की पक्ष परत ए.टी. नाना पाटील यांना तिकीट देणार अशी चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---