⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राष्ट्रीय | हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू

हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । तामिळनडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्विट करीत दुःख व्यक्त केले आहे.

हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्यावेळी ते त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले.

बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले CDS अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली बिपिन रावत हे पहिली व्यक्ती आहे. CDS म्हणजेच संरक्षण कर्मचारी हे अधिकारी आहेत जे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.