⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार तथा समाजवादी चळवळीतील अध्वर्य साथी गुलाबराव वामनराव पाटील (Gulabrao Patil passed away) यांचे ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज २३ रोजी दुपारी २ वाजता दहिवद ता अमळनेर येथून निघणार आहे.

राजकीय कारकीर्द
गुलाबराव वामनराव पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. गुलाबराव वामराव पाटील यांनी १९७८ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या दाभाडे रामदास सुग्राम यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी १९८० साली जेपींच्या जनता पार्टीकडून निवडणूक लढवली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या संभाजी गोविंदराव चव्हाण यांचा पराभव केला, यानंतर त्यांचा अमृतराव पाटील यांच्याकडून पराभव झाला. मात्र गुलाबराव पाटील पुन्हा १९९० साली, काँग्रेसचे दाजिबा पर्बत पाटील यांचा पराभव करुन पुन्हा आमदार झाले.ते आधी लोकल बोर्डावर, यानंतर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.

विधानसभेत पहिल्यांदाच राजदंड पळवल्याच्या घटनेनंतर त्यांच्या नावाची चर्चा होती. गुलाबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्याचा शैक्षणिक विकास केला. साने गुरूजी यांच्या कर्मभूमीतील गुलाबराव पाटील हे साने गुरुजींच्या विचाराने भारावलेले होते. शत्रूच्या घरी जेवायला जाण्याची तयारी ठेवणारा हा विरोधक होता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.