---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकरांसाठी खुशखबर ! आता जळगावहुन मुंबईसाठी विमानसेवा सुरु होणार, वाचा बातमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । जळगाव विमानतळाहून एप्रिल महिन्यात हैदराबाद व गोव्याला सुरू झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यात जळगावहून पुण्यासाठीही विमानसेवा सुरु झाली. यानंतर आता लवकरच मुंबई-जळगाव अशी विमानसेवा सुरू होणार आहे. भारत सरकारच्या अलायन्स या एअरलाइन्स कंपनीकडून ही सेवा पुरवली जाणार असून अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

jalgaon mumbai flight jpg webp

मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यास एअरलाइन्स कंपनीला नुकतीच प्राथमिक स्वरूपाची परवानगी मिळाली आहे. सध्या उडान ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा, हैद्राबाद तसेच २७ मे पासून ‘फ्लाय ९१’या विमान कंपनीकडून जळगाव-पुणे विमानसेवा सुरू करण्यात आली असताना आता मुंबईसाठीही विमानसेवा सुरू होत आहे.

---Advertisement---

भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून लवकरच मुंबई-जळगाव अशी विमानसेवा सुरू होणार आहे. खरे तर सुवर्णनगरी म्हणून संपूर्ण जगभर ख्यातनाम असलेल्या जळगाव शहरातून शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसायसह अशा विविध कामांसाठी राजधानीत येत असतात. मात्र, सध्या जळगाव नगरीतून मुंबईत जाण्यासाठी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचाचं पर्याय उपलब्ध आहे.

रेल्वेने प्रवास करायचा झाला तर सुमारे आठ तासांचा प्रवास करावा लागतो आणि ट्रॅव्हल्स प्रवास करायचा झाला तर दहा तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय. यामुळे मुंबईत येऊन पुन्हा काम आटपून घरी जाणे खूपच अवघड होऊन जाते. रेल्वे आणि ट्रॅव्हल्स प्रवासामुळे नाकी नऊ येतात. यामुळे अनेकांच्या माध्यमातून या मार्गावर नवीन विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. अखेर या मागणीनुसार अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमान सेवेला मान्यता मिळाली असून जून महिन्यात ही विमान सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू झाल्यावर अर्धा ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे. या सेवेचा मोठा फायदा व्यापाऱ्यांना मिळणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---