---Advertisement---
जळगाव जिल्हा

खुशखबर! जळगावहुन लवकरच या तीन शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी असून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत लवकरच जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएकडून काल बुधवारी (दि. ६) परवानगी मिळाली आहे. आठवडाभरात विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे

airplain jpg webp

मागील गेल्या तीन वर्षांपासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे. विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर, जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी उडान योजनेच्या तिसऱ्या राउंडमध्ये नवीनच स्थापन झालेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगावहून एकाच वेळी पुणे, गोवा व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली.

---Advertisement---

परंतु; केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या निवडणूक प्रचारात अडकल्याने कंपनीला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत होता. अखेर सर्व परवानगीनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने बुधवारी प्रमाणपत्र दिले. यामुळे आता लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा हैद्राबादसाठी विमानसेवा सुरु होणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---