गुडन्यूज: जळगावहुन गोवा-हैद्राबादसाठी 18 एप्रिलपासून सुरु होणार विमानसेवा; वेळापत्रक, दर जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली जळगावची विमानसेवा अखेर सुरु होत आहे. भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजनेअंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ विमानतर्फे १८ एप्रिलपासून गोवा व हैद्राबाद शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. त्यानुसार विमान कंपनीने वेळापत्रक, दरही निश्चित केले आहेत.
जळगाव विमानतळावरून गोवा व हैद्राबादसाठी आठवडधातील तीन दिवस ही सुविधा असेल. दोन्ही शहरासाठी दिवसातून दोन फ्लाइट अशा सहा वेळा फ्लाइट असेल. फ्लाय ९१ कंपनीला गोवा, हैद्राबाद व पुण्यासाठी विमानसेवा पुरवण्याची परवानगी मिळाली. त्यातील पुणे शहराची सुविधा अद्याप अंतिम टण्यात आहे.
१८ एप्रिलपासून गोवा व हैद्राबादसाठी सेवा सुरू होत आहे. मंगळवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी ही सुविधा असेल, कंपनीचे एअरक्राफ्ट ७२ आसनी असणार आहे. सध्या कंपनीने १९९१ रुपयांत गोवा व हैद्राबाद या दोन्ही शहरासाठी वेलकम योजना सुरु केली आहे. जळगावातून ४.३५ ला फ्लाइट उड्डान भरून ६.३० वाजता हैद्राबादला पोहचेल, संध्याकाळी ७ वा. तेथून निघून जळगावात रात्री ८.३५ वा. पोहचेल, जळगाव- हैद्राबाद विमान प्रवासाचा अवधी १ तास ५५ मिनिटांचा असेल.
विमानसेवेची वेळ अशी असेल
कंपनीच्या संकेतस्थळावर विमानसेवेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार, बुधवार व शनिवार या तीन दिवशी दोन फ्लाइट ये-जा करतील. गोव्याहून दुपारी २.२५ फ्लाइट निघून जळगावात ४.०५ ला पोहचेल. त्यानंतर रात्री ९०५ फ्लाइट जळगावहून निघून गोव्याला १०.५० वाजता पोहचेल. गोव्याचा प्रवास १. ४५ मिनिटांचा असेल.
दरम्यान, विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्याने आता जळगावातील व्यावसायिक, उद्योजकांसह राजकीय नेत्यांची सुविधा होणार आहे.