⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

महापालिकेत उड्डाण पदोन्नती : तीन दिवसात मजूर झाले अभियंता

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१। जळगाव महानगरपालिकेममध्ये नेहमीच काही ना काही चमत्कार होत असतात. यातच आता एक नवीन चमत्कार पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे मजूर, कुली आणि माळी या पदांवर भरती झालेले कित्येक कर्मचारी केवळ तीन दिवसांमध्येच अभियंता पदी विराजमान झाले होते. यामध्ये प्रामुख्याने नाव घेतले तर सध्याचे शहर अभियंता अरविंद भोसले आणि प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांचा समावेश आहे.

१९९२ व १९९७ साली तत्कालीन नगरपालिकेने चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांची जम्बो भरती करण्यात आली होती. नियुक्ती पत्र दिल्यानंतर तीनच दिवसात बहुतांश कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती. ज्यामध्ये तत्कालीन चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी तीन दिवसात थेट अभियंता पदावर जाऊन बसले होते. याबाबत २०१९ साली लेखापरीक्षण झाल्यानंतर शासनाकडे दिलेल्या प्रस्तावावर शासनाने आदेश काढत मनपा अधिकाऱ्यांना दणका दिला होता. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात चतुर्थश्रेणी पदावर वर्ग करा अन्यथा त्यांची पदोन्नती रद्द करा असा आदेश शासनाने दिले आहेत.

या प्रकरणाला जरी पंचवीस वर्षे पूर्ण झाले असले तरी या प्रकरणी आता लेखा परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसह तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. २०२१ मध्ये औरंगाबाद येथील लेखापरीक्षण समितीने या पदोन्नती बाबत आक्षेप नोंदवला होता.

काय आहे आदेश?
राज्य शासनाकडून मनपाकडे प्राप्त झालेल्या आदेशात तत्कालीन मुख्य अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कारवाई करणे कठीण असल्याचे सांगितले आहे. सद्यस्थितीत उड्डाण पदोन्नत्ती घेऊन मनपात अधिकारी झालेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पदावर करण्यात यावे किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या वेतनात शास्ती लावण्यात यावी असे आदेश आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडे त्वरित जमा करण्याची सूचना मनपा प्रशासनाला दिली आहे.

  1. हे कर्मचारी थेट झाले अधिकारी
  2. अरविंद भोसले – आधी मजूर होते व नंतर उपआवेक्षक झाले.
  3. इस्माईल अब्दुल आधी मजूर होते मग सर्वेअर झाले.
  4. संजय नेवे आदी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
  5. गोपाळ लुले हरी मजूर होते मग सर्वेअर झाले.
  6. जितेंद्र यादव आधी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
  7. संजय नेमाडे आधी माळी होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
  8. मंजूर खान आधी मजूर होते मग बिल्डिंग इन्स्पेक्टर झाले.
  9. सुनील भोळे आदी मजूर होते मग कनिष्ठ अभियंता झाले.
  10. विलास सोनावनी पहिले मजूर होते नंतर कनिष्ठ अभियंता झाले.
  11. चंद्रकांत वांद्रे आधी वाचमेन होते मग क्लोरीन ऑपरेटर झाले.
  12. राम रावलानी आणि अधिक कुली होते मग मिश्रक झाले.
  13. राजेंद्र पाटील आधी माळी होते मग आरोग्य निरीक्षक झाले.
  14. फिरोज काझी आणि मजूर होते मग सर्वेयर झाले.
  15. फिरोज काझी आधी मजूर होते मग सर्वेअर झाले.
  16. अकबर पिंजारी यादी मंजूर होते मग उद्यान अधीक्षक झाले.
  17. शिवलाल पाटील आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
  18. राजेंद्र वाघ आधी माळी होते मग मोटारचालक झाले.
  19. अकबर सय्यद अली माळी होते मग मोटार चालक झाले.
  20. रमेश तांबट आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
  21. सुरेश कोळी आधी माळी होते मग मोटार चालक झाले.
  22. संजय पाटील आधी मजूर होते मग बिल्डींग इंस्पेक्टर झाले.
  23. विलास सूर्वे आधी मंजूर होते मग इलेक्ट्रिक ओव्हर सिजर झाले.
  24. विलास पाटील आधी मजूर होते मग इलेक्ट्रिशियन झाले.