जळगाव जिल्हा
त्या ६३ बॅनर मालकांना बजावल्या जाणार नोटीसी
जळगाव लाईव्ह न्युज | महापालिका विशेष | जळगाव महानगरपालिकेच्या पथकाने आज शहरातील विविध भागांमध्ये जाऊन रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स उतरवले. आज दिवसभरात एकूण 63 फ्लेक्स महानगर पालिकेच्या पथकाने उतरवले. उद्या म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी या सर्व फ्लेक्स मालकांना महानगरपालिकेतर्फे शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत नोटीस बजावल्या जाणार आहेत.
शहरात ठिकठिकाणी अनधिकृत फ्लेक्स चा बाजार झाला आहे. जळगाव लाईव्ह देखील नुकतीच याबाबत ची बातमी प्रकाशित केली होती. आज महानगर पालिकेच्या पथकाने असे 63 अनधिकृत फ्लेक्स उतरवले आहेत. व या सर्व फ्लेक्स मालकांना उद्या नोटीस दिल्या जाणार आहेत.
उद्या शहरातील अजून काही भागांमध्ये जाऊन अशाच प्रकारे अनधिकृत फ्लेक्स काढले जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेतील सूत्रांनी दिल.