जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला; आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?

सप्टेंबर 17, 2025 8:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२५ । सध्या जळगावसह राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जळगाव जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून नद्यांचे पाणी थेट गावांमध्ये शिरल्याने पशूधनासह पिकांची हानी झाली. दुसरीकडे जिल्ह्यात आगामी चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

RN17Sep

हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्यात आजपासून १७ ते २० सप्टेंबरपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे नाले, नद्यांचं पाणी थेट गावात शिरले तर शेतातील पिकेही पाण्याखाली गेली. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक मोठे-लहान धरण तुंबून भरले आहे. ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मोठा प्रश्न सुटला आहे.

Advertisements

उकाड्यापासून दिलासा

मागच्या काही दिवसापूर्वी पावसाचे विश्रांती घेतल्यानं तापमान ३२ अंशापर्यंत वाढून उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. ज्यामुळे जळगावकर घामाघूम झाले होते. मात्र जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसापासून वातावरणात पुन्हा बदल झाला. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट तर झाली शिवाय झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळाला. दरम्यान आज बुधवारी जळगाव जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. हवामान खात्यानं जिल्ह्याला आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Advertisements

उरलं-सुरलं पीकही हातातून गेले?

यंदा गणपती आगमनापूर्वी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानातून शेतकरी सावरत नाही तोवर आता जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उरलं-सुरलं पीकही हातातून गेले.

जळगावात आगामी पाच दिवस हवामानाची स्थिती

१७ सप्टेंबर : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
१८ सप्टेंबर : ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
१९ सप्टेंबर : ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
२० सप्टेंबर : ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
२१ सप्टेंबर : दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now