⁠ 
सोमवार, मे 6, 2024

राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पर्धेत गोदावरी नर्सिंगचे विदयार्थ्यांना प्रथम पारीतोषीक

जळगाव लाईव्ह न्यूज । दि २४ दि २२ व २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिकचा राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २४ अमरावती येथील पंजाबराव देशमुख मेमोरियल वैद्यकिय महाविद्यालयात पार पडला. स्कीट आणि मीमीक्री स्पर्धेत जळगावातील गोदावरी नर्सिंगच्या विदयार्थ्यांनी प्रथम पारितोषीक प्राप्त करीत विजेतेपद मिळवले.

स्किट स्पर्धेत डीवायना पवार, एन्जीला एलेस,जान्हवी सोनवणे, रोशनी भट, मानसी राउत, अस्लेषा संदवे,वनेश मेश्राम, पुष्पक, आणि ओम बुरले यांनी तर बी एस्सी तृतीय सत्राची मुक्‍ता पवार हीने मिमीक्रि स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत या स्पर्धेवर वचर्स्व गाजवले. त्यांच्या यशाबददल चषक,प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले.

याचबरोबर माहीम स्पर्धेत प्रियंका इंगळे, ओम शेटे, तनय सोनले, सुनिल राठोड, क्रिष्णा गोंदले आणि विष्णू मुंडे यांनी यशस्वी सहभाग नोंदवला त्यांना प्राचार्य विशाखा गणविर, प्रा. मनोरमा कश्यप, प्रा स्वाती गाडगोणे, प्रा.मानसी ढोबळे,प्रा. एन्जल एडयुस,यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबददल अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्‍त करून अभिनंदन केले आहे.