⁠ 
[rank_math_breadcrumb]

भाजपची पहिली यादी जाहीर; जळगावमधून राजूमामा भोळे यांना पुन्हा संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अखेर महायुतीमधील भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात जळगाव शहरातून आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

भाजपकडून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

तसेच भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील वाट्याला सुटलेल्या पाच जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये जळगाव शहरातून आमदार सुरशे भोळे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गिरीश महाजन यांना जामनेर, संजय सावकारे यांना भुसावळ मंगेश चव्हाण यांना पुन्हा एकदा चाळीसगावातून तर यंदा रावेरमधून स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना संधी देण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.