जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणूक निकालानंतर बहुप्रतीक्षित असलेला फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी दुपारी ३ वाजता नागपुरात होत आहे. यासाठी राजभवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील.
मात्र महायुतीच्या तिन्ही पक्षांतून कोण कोण मंत्री होणार याबाबत अद्यापही गोपनीयता ठेवण्यात आली असून सध्या कोणत्या पक्षातील किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार याची माहिती समोर आली आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत.
शिवसेनेच्या 12 आमदारांना फोन
दरम्यान, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 12 आमदारांना फोन गेल्याची माहिती भरतशेठ गोगावले यांनी दिली. त्यामध्ये उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, विजय शिवतारे, आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांची नावे अंतिम झाल्याची माहिती गोगावले यांनी दिली.
भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
छगन भुजबळ
आदिती तटकरे
अनिल पाटील
संजय बनसोडे
अजित पवार
मकरंद पाटील
नरहरी झिरवाळ
धनंजय मुंडे
सना मलिक
इंद्रनील नाईक