मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात पुन्हा गोळीबार, तरुण जखमी

नोव्हेंबर 3, 2025 6:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात अवैध दारुअड्यावर गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. यात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आलीय.

Untitled design 6 jpg webp webp

एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज दि ३ नोव्हेंबरला गोळीबाराची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनू सुभाष बडगुजर (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) असे ​जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोळीबार करणारा त्याचा मित्र जितेंद्र किशोर कोळी (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) असल्याचे समोर आले आहे.

Advertisements

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पाळधी परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली असून गोळीबार करणारे देखील जखमीच्या परिचयाच्या असल्याची माहिती आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now