जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । देशातल्या राजधानी दिल्लीतील जनतेला प्रदूषणाच्या संकटापासून वाचवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही 1 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची आम आदमी पार्टी सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आज बुधवारी सकाळी यासंदर्भात घोषणा केली.
दिल्लीत फटाक्यांची ऑनलाइन विक्री/वितरण यावरही बंदी असेल, अशी माहिती त्यांनी दिली. ही बंदी 1 जानेवारी 2023 पर्यंत लागू राहील. बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी दिल्ली पोलिस, डीपीसीसी आणि महसूल विभागासोबत कृती आराखडा तयार केला जाईल.
गेल्या वर्षी दिल्ली सरकारने 28 सप्टेंबर ते 1 जानेवारी 2022 पर्यंत दिल्लीत फटाके विक्री आणि फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले होते. फटाके जाळण्याविरोधात जनजागृती करण्यासाठी शहर सरकारने ‘जलाओ फटाके’ ही मोहीमही सुरू केली होती. त्याचबरोबर फटाके फोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दुसर्या ट्विटमध्ये गोपाल राय म्हणाले, “हिवाळी कृती आराखड्याबाबत सर्व संबंधित विभागांसोबत बैठक झाली. सरकारने तयार केलेल्या १५ फोकस पॉइंट्सवर सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुमारे ३० विभागांना देण्यात आले. 15 सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांकडून अहवाल घेऊन सविस्तर हिवाळी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पर्यावरण विभागाला देण्यात आल्या आहेत.