भोपाळहून मुंबई जाणाऱ्या विमानाला आग, जळगावात लँडिंग आणि समजले ते…
जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । भोपाळहून मुंबईकडे जात असलेल्या विमानाला अचानक आग लागल्याची बातमी आली आणि सर्व सुरू झाले. आगीमुळे जळगाव विमानतळावर विमानाचे आपातकालीन लॅडींग करण्यात येत असल्याची माहिती यंत्रणेला मिळताच तातडीने यंत्रणा दाखल झाली. सर्व तत्पर असताना हा खराखुरा प्रसंग किंवा दुर्घटना नव्हती तर हे होते मॉकड्रील. जळगाव विमानतळावर राबविलेल्या या मॉकड्रीलमध्ये जिल्हयातील पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणा नक्कीच पास झाली.
नागरी उड्डायन प्राधीकरण व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या आदेशानुसार हे सराव प्रात्यक्षिक शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजता आपतकालीन तयारीची पाहणी करण्यासाठी जळगाव विमानतळावर घेण्यात आले. विमानाच्या इंजिनला आग लागल्याने जळगाव विमानतळावर इमर्रजन्सी लॅण्डींग करण्यात आल्याच्या सूचनेवरून जळगावातील अग्निशमन दल, सुरक्षा यंत्रणेसह आरोग्य कर्मचार्यांची धावपळ उडाली.
जीवाची पर्वा न करता या यंत्रणेच्या कर्मचार्यांनी विमानतळावर धाव घेतली. सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यात प्रत्यक्ष घटनेच्या वेळी ज्या प्रमाणे यंत्रणा तत्परतेने कार्यरत होणे अपेक्षित असते, त्याची पडताळणी करण्यात आली. या सराव शिबाराचे निरिक्षण करण्यासाठी उप जिल्हाधिकारी, विमान प्राधीकरणाचे स्थानिक संचालक सुनिल मग्गेरीवार, औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रा. डॉ. विलास मानकर आदींची उपस्थिती होती.