⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

जाणून घ्या कोण आहेत IAS पूजा सिंघल? ज्यांची सुमारे 150 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal)यांच्या घरावर शुक्रवारी छापा टाकला. ईडीची कारवाई अजूनही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयएएसच्या सीएच्या घरातून ईडीला 25 लाखांची रोकड मिळाली असून सिंघल यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या चार्टड अकाऊंटच्या दिल्लीतील घरातून मोठं घबाड हस्तगत केलं आहे. पूजा सिंघल यांच्या विश्वासातील चार्टड अकाऊंटकडे केलेल्या छापेमारीत ईडीला 19 कोटी 31 लाख रुपये सापडले आहेत. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. निकटवर्तीयावर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा पूजा सिंघल या चर्चेत आल्या आहेत. तर जाणून घेऊया कोण आहेत या आयएएस अधिकारी आणि ते का चर्चेत आले आहेत?

पूजा सिंघल या झारखंडच्या वरिष्ठ अधिकारी आहेत
पूजा सिंघल या झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत, सध्या उद्योग आणि खाण सचिव म्हणून नियुक्त आहेत. याआधी पूजा भाजप सरकारमध्ये कृषी सचिव म्हणून कार्यरत होत्या. मनरेगा घोटाळ्याच्या गाजलेल्या काळातही पूजाची उपजिल्हाधिकार्‍यानंतर खुंटी येथे नियुक्ती झाली होती.

वादांचे जुने नाते
पूजा सिंघल या वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांचे नाव वादात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खुंटी आणि पलामू जिल्ह्यात उपायुक्त पदावर असतानाही त्यांच्यावर अनियमिततेचे आरोप झाले होते.

सर्वात कमी वयात आयएएस झाले
पूजा सिंघल या 2000 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. अवघ्या 21 वर्षात त्यांची नागरी सेवांमध्ये निवड झाली आहे. सर्वात तरुण आयएएस बनल्यामुळे त्याचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

आतापर्यंत 19.31 कोटी रोख मिळाले आहेत
पूजा सिंघल यांच्यावर सुरू असलेल्या छाप्यांमध्ये, पहिल्याच दिवशी 19.31 कोटी रुपयांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात ईडीला यश आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत, ज्याची ईडी टीम चौकशी करत आहे.