जळगावकरांना क्षणभर दिलासा ; रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात
जळगाव लाईव्ह न्युज | ३० सप्टेंबर २०२१ | शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था सर्वश्रुत आहे. शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यावरील मुरूमही वाहून गेला आहे. अखेर महापौर जयश्री महाजन यांच्या पाठपुराव्याने आज जळगाव शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना क्षणभर का होईना पण दिलासा मिळणार आहे.
पिंप्राळा रोड, स्टेशन रोड, गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगर, बळीराम पेठ व शनिपेठ या ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. रस्त्यांची दुरावस्था पाहून महापौर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी आयुक्तांना पात्र लिहिले होते. ज्यात लावकरात लवकर काम न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशा इशारा देण्यात आला होता. अखेर आज कमला सुरवात झाली आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी काम चालू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत कामाचा आढावा घेतला.
पावसामुळे खराब झालेल्या शहरातील इतर रस्त्यांचेही काम लवकर सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील बऱ्याच रस्त्यांची कामे ही मंजूर झाली असून पावसाळा सुरू असल्याने कामे थांबली आहेत. पावसाळा संपल्यावर त्वरित ही कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.