⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | बातम्या | अखेर…बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला आले यश

अखेर…बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला आले यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । ८ एप्रिल २०२२। बुलढाणा येथील देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथील एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला अखेर जीवदान देण्यास वन विभागाला यश आले.

अधिक असे की, खल्याळ गव्हाण येथील हद्दीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धूमाकूळ घालावी होती. ११ फेब्रुवारी रात्री बिबट्याने शेतातील गोठ्यासमोरील अंगणात बांधलेल्या गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला फस्त केल्याची असल्याची घटना घडली होती. पुन्हा १७ फेब्रुवारी रोजी बिबट्याच्या आगमनामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली होती. बिबट्याने बाजूच्या उसाच्या शेतात शिरकाव केला असल्याची माहिती मिळाल्याने वनविभागाने ड्रोनद्वारे परिसराचे सर्वेक्षण केले.

दरम्यान ७ एप्रिल रोजी सुखदेव बनकर यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची माहिती ज्ञानेश्वर शेळके यांनी दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यासाठी विहिरीमध्ये बाज सोडण्यात आली. त्यानंतर रेस्क्यू टीमला बोलाविण्यात आले. यावेळी त्याला बघण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात आले. बिबट्याला वाचवण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस. एस. दुबे, वनविभागाने बिबट्याला आर. बी. पवार, बिलारी, एच. एच. पठाण, श्रीराम काकड, एस. डी. सानप, समाधान मांटे, संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, दीपक गायकवाड, सागर भोसले, शेख समीर आदींनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.