नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
जळगाव लाईव्ह न्युज | १३ सप्टेंबर २०२१ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेश उत्सव सार्वजनिक मंडळासाठी एक नियमावली बनवली आहे. ज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती ही चार फुटाहून उंच नको असे आदेश दिले आहेत. तरीदेखील चार फुटाहून अधिकच्या गणेश मूर्ती स्थापन केलेल्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील आणखी तीन गणेश मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मूर्तिकार राजेंद्र राणा यांनी चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती बनवून श्रीमंत रामशेठ चौबे गणेश मंडळ सागर पार्क यांना विक्री करून शासनाचे उल्लंघन केले होते या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
पहिल्याच दिवशी बळीराम पेठेतील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मूर्ती कारण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता
यांच्यावर करण्यात आले गुन्हे दाखल
रथ चौकातील श्रीराम तरुण संस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष जीवन तायडे , उपाध्यक्ष राहुल मिस्त्री आणि सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष भोजराज राजपूत, चेतन तिवारी, मूर्तिकार राजेंद्र राणा, यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.