---Advertisement---
गुन्हे यावल

लहान मुलांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी ; यावल येथे पाच जण जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । यावल शहरातील बाबुजीपुरा परिसरातील लहान मुलांच्या वादातून दोन गटात मारा मारी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी यावल पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

सविस्तर माहिती अशी की, यावल नगरातील बाबुजीपुरा भागात राहणाऱ्या कलीम खान जब्बीउल्ला खान, सर रईस खान जब्बीउल्ला खान तर समोरील शेख सलीम शेख अजीज उर्फ बाबा यांच्या घरासमोर लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून गेल्या ३ ते ४ दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू होता .याचे पर्यावसन आज वाद विकोपाला गेल्याने दोन गट एकमेकांना भिडले. दोन्ही गटांमध्ये बदाम मारहाण केल्याची घटना आज २५ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली.

---Advertisement---

यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत चौघांना यावल ग्रामीण रूग्णालय उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम किडके, परिचारिका नेपाली भोळे यांनी उपचार सुरु केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हेते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---