जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये ड्युटी लावण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा हात फ्रॅक्चर झाला असून दुसऱ्याच्या डोक्याला मार लागला आहे.राकेश तानकू पाटील आणि शशिकांत हिरालाल पारधी अशी या पोलिसांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अनेक वर्षापासून कार्यरत असलेले राकेश पाटील आणि शशिकांत पारधी यांच्यात आपापसांत जुने हेवेदावे आहेत. ड्युटी लावण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद व त्यानंतर रात्री हाणामारी झाली.

यात राकेश यांचा हात फॅक्चर झाला असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना चोपडा येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही गेल्या पाच वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ड्युटी लावण्यावरून वाद झाल्याचे सांगितले जात असले तरी खरे कारण वेगळे असावे, असे सांगितले जात आहे. राकेश पाटील ट्रॅफिक विभागात, तर शशिकांत पारधी लासूर बीटवर कार्यरत आहेत. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.








