जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे लाखोंचा खर्च करून पिकविलेल्या केळीला म्हणावा तास भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. यातच मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केळीच्या बागेतील सुमारे १८० खोडे कापून टाकल्याची धक्कादायक घटना वडगाव शिवार परिसरात घडली. या घटनेनं शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडगाव शिवार परिसरात बन्सी गारसे यांनी नफ्याने घेतलेल्या नथ्थू बढे यांच्या वाटणीत तसेच रमेश गारसे यांच्या वाटणीतील बागायत क्षेत्रात ही घटना घडली असून न्सी गारसे यांच्या वाटणीत सुमारे ८० केळी खोडे, तर रमेश गारसे यांच्या शेतातील अंदाजे १०० केळी खोडे अज्ञातांनी कापून टाकल्याचे सकाळच्या सुमारास निदर्शनास आले.

या घटनेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून या प्रकरणाची माहिती तातडीने संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.









