---Advertisement---
जळगाव जिल्हा

खान्देशातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसासाठी ‘या’ तारखेपर्यंत पाहावी लागणार वाट

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलीय. काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल. तरी अद्याप काही ठिकाणी पावसाने निराश केलं आहे. खान्देशात अद्यापही पावसाने जोरदार हजेरी लावली नाहीय पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी खोळंबली आहे. खान्देशातील शेतकऱ्यांना मुसळधार पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

rain 5 jpg webp webp

मुसळधार पावसासाठी 3 जुलै पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. खान्देशात उशिराने दाखल झालेल्या पहिली झलक पाहिजे तशी झाली नाहीय. दोन दिवसापूर्वी तासभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, त्यांनतर काल २७ जून रोजी कमी अधिक प्रमाणात रिपरिप सुरु होती. रिपरिप पावसामुळे गारवा जाणवत असला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा खान्देशात ९३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अडचणीत वाढ होऊ शकते.

---Advertisement---

राज्यातील या भागात पावसाचा अलर्ट जारी?
दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी धुवांधार पावसाची बँटींग सुरु आहे. काही ठिकाणी सततच्या पावसानं नदी – नाले वाहू लागले असून आता शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान विभागानं कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---