---Advertisement---
जळगाव जिल्हा

पिक विम्यासाठी रावेरात शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । सध्या केळी पिकावर कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.)च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यातच केळी पिकविमाची रक्कम व मागील ‘सीएमव्ही’ अनुदान तसेच सन २०२३-२४ झालेल्या ‘सीएमव्ही’ रोगाच्या बांधीत झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनाने करून नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात रावेरात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. सुमारे एक तास अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्ग हे आंदोलन करण्यात आले

raver farmer strick jpg webp

यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अखेर प्रशासनाच्या मध्यस्ती नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत विमा कंपनीला आठ दिवासाची मुदत देण्यात आली आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. केळी पीक विमा रक्कम मिळालीच पाहिजे, विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बाप्पाचा.. पीक विमा देता का घरी जाता.. यासह विविध आशयाचे फलक यावेळी दिसून आले.

---Advertisement---

आक्रमक शेतक-यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर शेतकऱ्‍यांच्या खात्यावर येत्या ८ दिवसात पिक विमा रक्कम कंपनीतर्फे वर्ग करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जळगाव येथून उपविभागीय कृषी अधिकारी सूरज जगताप, तंत्र अधिकारी दिपक ठाकुर उपस्थित होते. तर निवेदन तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनाला पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---