जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की मुसळी येथील रहिवासी अरुण विजय मोरे वय 41 यांचा सर्पदश झाल्याने मुत्यु झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता झाली झाली.मत्स उदयोगाचा सामान काढण्यासाठी अरुण मोरे गेले असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला.
ही घटना त्यांचा मुलगा कपील च्या लक्षात आली आणि त्याने आपले वडील अरुण मोरे यांना बेशुद्ध अवस्थेत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मुत घोषित केले.अरुण मोरे यांना दोन मुले आहे असा त्यांचा परिवार आहे.