---Advertisement---
गुन्हे पारोळा

कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील देवगाव येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतात विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दिलीप ओंकार मराठे (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, आमदार चिमणराव पाटील यांचे गाव असलेल्या देवगावात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

dilip marathe succied jpg webp

याबाबत असे की, शेतकरी दिलीप मराठे यांनी गावातील विकास सोसायटीकडून एक लाखांचे कर्ज काढले होते. तसेच उसनवारीचे त्यांनी दोन लाख रुपये घेतले होते. मागील दोन वर्षांपासून असलेला दुष्काळ, तसेच यंदा अतिवृष्टीमुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता ते नेहमीप्रमाणे शेतात गेले.

---Advertisement---

तेथेच त्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती कळवली. लहान मुलगा योगेश पाटील व इतरांनी त्यांना कुटीर रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. याबाबत पारोळा पोलिसात योगेश पाटील यांनी फिर्याद दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---