जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । कर्जाच्या विवंचनेतून विष प्राशन करून एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील विटनेर येथे घडलीय. गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत असे की, मकर संक्रातीच्या दिवशी गोकुळ वराडे हे शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमीनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस प्रदिप पाटील करीत आहेत.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ