⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

भारनियमनाच्या निषेधार्थ चोपड्यामधील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची होतेय चर्चा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात तापमानाने उच्चांकी गाठली असताना त्यातच वीज वितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी लोड शेडिंग करत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणाम म्हणून पिके करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

महावितरच्या या भारनियमनाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील चोपडा येथील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीजवितरण कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाची आता जळगावमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे वीज वापर वाढला आहे. त्यामुळे वारंवार वीज गुल होत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाराची समस्या कमी करण्यासाठी रोज रात्री फिडरनिहाय दीड तास भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

चोपडा तालुक्यातील अंवरदे गावातील शेतकरी उरवेश साळुंखे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच कार्यालयाच्या दारातच झोपा काढ आंदोलन सुरू केले आहे.