जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । जामनेर तालुक्यातील वडगाव तिग्रे येथील राशन दुकानदार यांच्या विरोधात तक्रारी अर्ज पुरवठा अधिकारी यांच्याकडे केल्याच्या कारणावरून अमृत दिनकर गव्हाळे यांना व त्यांच्या कुटुंबाला रेशन दुकानदार व त्यांचे सहकाऱ्यांनी जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना २५ मे रोजी घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय नियमाप्रमाणे एका व्यक्तीस ५ किलो धान्य मिळत आहे. त्यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिल जात आहे. अस असतानाही वडगाव तिग्रे येथील रेशन दुकानदार तीन किलोच धान्य देत असल्याची तक्रार अमृत दिनकर यांनी जामनेर पुरवठा अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने पुरवठा कार्यालय जामनेर येथील दोन कर्मचारी यांनी त्या रेशन दुकानाची तपासणी करून तेथून निघून गेले.
त्यानंतर रेशन दुकानदार मधुकर ओंकार मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रार केल्याच्या कारणावरून अमृत गव्हाळे यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांसह भावाला शिवीगाळ करत जबर मारहाण केली. यात अमृत दिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली तर त्यांच्या आई सुशीलाबाई यांना देखील डोक्याला दुखापत केली.
दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबाबानंतर पोलिसांनी अँट्रासिटी ऍक्टचा कलम देखील वाढवला आहे.