⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

गृहिणींसाठी खुशखबर! लसणाच्या दरात मोठी घसरण, आता किती आहे किलोचा दर?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । गेल्या काही दिवसापूर्वी लसणाचा दर ४०० रुपये किलोवर गेला होता. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मात्र आता लसणाच्या दरात मोठी घसरण झाली. मध्य प्रदेशातून नवीन लसूण बाजारात येण्याचे प्रमाण वाढल्याने दरात घसरण झाली ४०० रुपये किलोवर असलेला लसूण सध्या १०० रुपये किलोपर्यंत घसरला. दर घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे

नवीन लसूणाची काढणी वाढल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवीन ओला लसूण बाजारात आला आहे. यामुळे दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात ४०० ते ४२० रुपये किलोवर असलेला लसूण आता १०० रुपये किलोने विक्री होत आहे. नुकताच काढणी झालेला ओला लसूण बाजारात आल्याने मागणीही वाढली आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या नवीन लसूणाची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारात केवळ पांढरा संकरित लसूण उपलब्ध होत आहे. बाजारात आवक वाढल्याने शहरातील विविध भागांमध्ये हातगाडी व रिक्षांमधून विक्री होत आहे. हे लसून खरेदी करण्यासाठी महिलांकडून पसंती दिली जात आहे. पावशेर लसून घेणाऱ्या महिला आता एक ते दोन किलोवर लसून खरेदी करताना दिसत आहे.