⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | खुशखबर : चक्क फेसबुक देणार विनातारण ५० लाखांपर्यंत कर्ज

खुशखबर : चक्क फेसबुक देणार विनातारण ५० लाखांपर्यंत कर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । छोट्या व्यवसायिकांची आणि विशेषतः महिलांची कर्ज मिळण्यास मोठी फिरफिर होत असते. आपल्या नेहमीच्या वापरातील फेसबुक (Facebook India) सर्वांसाठी धावून आले असून फेसबुक छोट्या व्यावसायिकांना चक्क ५० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. कर्जाची योजना देशातील २०० शहरांमध्ये उपलब्ध असणार असून यासाठी फेसबुकने इंडिफायसोबत करार केला आहे. (Facebook Loan)

जाहिरात करा, कर्ज मिळवा
लघु व्यवसाय कर्ज उपक्रमाच्या माध्यमातून लहान व्यापाऱ्यांना कर्ज मिळेल. योजनंतर्गत व्यापाऱ्यांना कर्ज घेण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना प्रथम त्यांच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करावी लागेल. यानंतर व्यापाऱ्यांना ५ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर १७ ते २० टक्के इतके व्याज आकारले जाईल.

महिलांना सूट, ५ दिवसात कर्ज
फेसबुकच्या योजनेत महिला व्यावसायिकांना व्याजदरात ०.२ टक्क्यांची सूट मिळेल. सध्या फेसबुकने इंडिफायच्या माध्यमातून देशातील २०० शहरांमध्ये ही योजना सुरु केली आहे. कर्जदाराने आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर पाच दिवसांत कर्जाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.

देशाच्या विकासाला मिळणार चालना : अमिताभ कांत
निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की लघु, छोटे आणि मध्यम स्वरुपाचे उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा आहेत. फेसबुकच्या या योजनेमुळे देशाच्या विकासाला हातभार लागण्यास मदत होणार आहे. तर फिक्कीचे अध्यक्ष उद्यशंकर म्हणाले की फेसबुकची ही योजना कौतुकास्पद आहे. यामुळे लघु, छोटे आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळेल. विशेषत: त्या कंपन्यांना किंवा व्यवसायांना जे तारण ठेवून कर्ज घेऊ शकत नाही. मात्र त्यांना वर्किंग कॅपिटल म्हणजे कामकाजी भांडवल मिळाले तर या संकट काळातदेखील त्या आपला व्यवसाय वाढवू शकतात. कर्जासाठी तारण नसल्यामुळे बॅंक आणि इतर वित्तीय कंपन्या त्यांना व्यावसायिक कर्ज देत नाहीत.

Facebook India घेणार नाही फायदा, उद्योजकांना मिळणार मदत
अजित मोहन म्हणाले की फेसबुक संपूर्ण देशात लघु, छोटे आणि मध्यम स्वरुपाचे उद्योगांना मदत करणार आहे, जेणेकरून औद्योगिक विकासाला मदत होईल. यामध्ये फेसबुक कोणताही फायदा घेणार नाही. फेसबुकने इंडिफायशी करार केला आहे. मात्र याचा उद्देश व्यावसायिक नाही. मागील एक वर्षाक कंपनीने अनेक पावले अशी उचलली आहेत जेणेकरून लघु, छोटे आणि मध्यम स्वरुपाचे उद्योगांना आपला व्यवसाय पुढे नेण्यास मदत मिळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.